Model & Multi-media Actor

रजनी वैद्य. आपलासा करणारा चेहरा. सहजपणे नातं जोडणारे डोळे. हसतमुख, प्रसन्न आश्वासक व्यक्तिमत्त्व. सतत सकारात्मक सळसळती ऊर्जा. अनेक पैलूंनी आयुष्य समृद्ध करण्याची इच्छाशक्ती त्याचबरोबर कष्टांची असोशी. समृद्ध अनुभवविश्वाचा समर्पक वापर, आपल्या अभिनयात, आपल्या हावभावात करून छोटया तसंच मोठया पडद्यावर आपलं अस्तित्व ठसठशीतपणे उमटवत आल्या आहेत.


त्या आपल्याला छोटया पडद्यावर अनेक रुपांमध्ये अनेक वर्षे भेटत आल्या आहेत. हाडाची शिक्षिका असल्याने समोरच्याशी सुसंवाद साधत, समजून समजावून त्यांनी या क्षेत्रातही नाती निर्माण केली आहेत. त्यांच्या चिकाटीवर, मेहनतीवर, सततच्या नाविन्याच्या ध्यासावर, त्या तजेलदार वृत्तीने या क्षेत्रात आगेकूच करत आहेत. या प्रवासात त्यांनी अनेक वळणं पार करत राजमार्गावर आपला प्रवास चालू केला आहे. हा प्रवासही अत्यंत मनोवेधक होईल हे निःसंशय!


रजनी वैद्य यांची थोडक्यात माहितीः -

शाळेतून रिटायर झाल्यावर या क्षेत्रात प्रवेश.

मराठी, हिन्दी चित्रपट, मालिका, जाहिराती.

वृत्तपत्र, होर्डिंग्ससाठी प्रिंट जाहिराती.

हिन्दी आणि इंग्लिश जाहिरातींसाठी परदेशात व देशात ठिकठिकाणी जाणे होते.


शिक्षणः एम्. ए. मराठी.

शिक्षिका, लायब्ररीयन.

रेकी ग्रॅंडमास्टर.


आवडः भटकंती. परदेशात व भारतात हिंडणे.
Biography Bio in Hindi